मुंबई : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. समाजकंटकांनी केलेल्या या कृत्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.
या आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.
More Stories
शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे ताबडतोब सुरु न केल्यास तीव्र आंदोलन : AISF चा राज्य सरकारला इशारा!
लढाऊ कामगार नेत्या कॉम्रेड सुशीला यादव यांना धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार जाहीर
कॉ.डॉ. प्रविण मस्तुद लिखित ‘अण्णाभाऊंचा रशियाचा प्रवास’ पुस्तिकेचे प्रकाशन