केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकरी उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे ते कायदे महाराष्ट्रात लागू करू नयेत, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि हम भारत के लोग या संस्थेच्या शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन, तसेच केंद्रीय कृषी कायद्यात दुरूस्ती सुचविणारे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे निवेदन महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांना मुंबईत देण्यात आले.
या शिष्टमंडळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विद्या चव्हाण, हम भारत के लोग संस्थेचे फिरोज मिठीबोरवाला, एस. एल. गुड्डी, एम. ए. खालीद यांचा सहभाग होता.
परतीच्या पावसामुळे राज्यातील काढणीला आलेल्या सोयाबीन, कापूस, कांदा, मका, ऊस, द्राक्ष, धान, तूर इत्यादी पिके व भाजीपाला यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या पिकांचे तातडीने पंचनामे करून एकरी त्या-त्या पिकाला लागलेला ऊत्पादन खर्च अधिक ५०% नफा धरून जी रक्कम येईल, ती नुकसान भरपाई म्हणून तातडीने देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
More Stories
शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे ताबडतोब सुरु न केल्यास तीव्र आंदोलन : AISF चा राज्य सरकारला इशारा!
लढाऊ कामगार नेत्या कॉम्रेड सुशीला यादव यांना धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार जाहीर
कॉ.डॉ. प्रविण मस्तुद लिखित ‘अण्णाभाऊंचा रशियाचा प्रवास’ पुस्तिकेचे प्रकाशन