साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

राष्ट्रीय महिला आयोगातून चंद्रमुखी देवी यांची हकालपट्टी करण्याची महिला संघटनांची मागणी

राष्ट्रीय महिला संघटनांचे संयुक्त प्रसिद्धीपत्रक


राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांनी बलात्कार करून मारून टाकलेल्या बदांयू येथील अंगणवाडी सेविकेच्या घरी भेट देताना केलेल्या वक्तव्याचा महिला संघटना अत्यंत तीव्र निषेध करीत आहेत. चंद्रमुखी देवी म्हणाल्या की, जर ती महिला एकटी न जाता बरोबर घरातल्या एखाद्या मुलाला घेऊन गेली असती तर तिच्यावर असा प्रसंग ओढवला नसता. ज्या महिला आयोगाने स्त्रियांच्या अधिकाराचे रक्षण करायचे त्याच महिला आयोगाच्या सदस्य जाहीरपणे गुन्हेगाराकडे दुर्लक्ष करून उलट त्याच्या दुष्कृत्याची जबाबदारी पीडितेवर टाकून मोकळ्या होत आहेत हे खरोखर लाजिरवाणे आहे. त्यांच्या या वक्तव्याचा हेतु मुख्यमंत्री योगी यांच्या सत्तेत स्त्रियांना भेडसावणाऱ्या असुरक्षिततेच्या भयानकतेवर पडदा घालण्याचाच आहे हे स्पष्ट आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची सदस्य सरंजामी आणि पुरुषप्रधान विचारसरणीचा प्रचार करीत आहेत हे धक्कादायक आहे. त्यांना ताबडतोब महिला आयोगातून काढून टाकावे अशी मागणी आम्ही करीत आहोत.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (AIDWA)

भारतीय महिला फेडरेशन (NFIW)

अखिल भारतीय प्रगतिशील महिला संघ (AIPWA)

प्रगतिशील महिला संघटना (PMS)

अखिल भारतीय महिला सांस्कृतिक संघटना (AIMSS)

अखिल भारतीय अग्रगामी महिला संघटना (AIAMS)