साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाचे शनिवारी लाक्षणिक उपोषण

नाशिक : दिल्लीत लढणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाला बदनाम करत असल्याच्या निषेधार्थ महात्मा गांधी पुण्यतिथनिमित्त ३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० वा. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

या उपोषणात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाचे राजू देसले, सुनील मालुसरे, शरद आहेर, रंजन ठाकरे, डॉ. डी. एल. कराड, अनिता पगारे, महादेव खुडे, व्ही. डी. धनवटे, विजय दराडे, विजय पाटील, नाना बच्छाव, किरण मोहिते, समाधान बागुल, आसिफ सर, शांताराम चव्हाण, नाझीम काझी, निशिकांत पगारे, भास्कर शिंदे, देविदास बोपळे, नामदेव बोराडे, मधुकर मुठाल यांनी केले आहे.
https://www.facebook.com/100002046224607/posts/3724189150992589/