साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

महाराष्ट्रात २६ मे रोजी होणार मोदींच्या पुतळ्याचे दहन; घरांवर फडकणार काळे झेंडे

मुंबई, ता. २० : मोदी सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी विरोधी ३ कायद्यांच्या विरोधात २६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. पण सरकारने त्यांच्या मागण्यांची अद्यापही योग्य दखल घेतलेली नाही. तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द झाल्याशिवाय व शेतमालाला हमी भावाचा कायदा केल्याशिवाय, तसेच असंघटीत कामगारांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा कायदे लागू केल्याशिवाय दिल्लीच्या सीमेवरून आम्ही परत जाणार नाही, असा निर्धार करत पुकारलेल्या या आंदोलनाला २६ मे रोजी ६ महिने पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ हा दिवस पूर्ण भारतभर काळा दिवस म्हणून पाळला आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्य किसान सभेने राज्यात ठिकठिकाणी मोदींच्या पुतळ्याचे दहन करण्याचा, तसेच महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात किमान १००० घरांवर काळे झेंडे फडकविण्याचा निर्णय घेतला आहे. किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

बैठकीला राज्य सरचिटणीस कॉ. नामदेव गावडे, अरूण वनकर, राजू देसले, डॉ. महेश कोपूलवार, विनोद झोडगे, अशोक सोनारकर, प्रा. राम बाहेती, बन्सी सातपुते, दुर्योधन मसराम, नामदेव चव्हाण, तुकाराम भस्मे आदी उपस्थित होते. सुभाष लांडे अध्यक्षस्थानी होते. राजन क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.