साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

मोदींचे नवे रेल्वेमंत्री रेल्वेला तारणार की खड्ड्यात घालणार?

म्हशीच्या पाठीवर बसणाऱ्या आणि जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून पुढे आलेल्या लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्री (२००४ – २००९) झाल्यानंतर भारतीय रेल्वे पुढे आणली. अटलबिहारी सरकारमध्ये तोट्यात चालणारी भारतीय रेल्वे त्यांनी २५००० कोटी रुपयांनी फायद्यात आणली. त्यासाठी प्रवासी वाहतुकीवर कोणतीही भाडेवाढ लादली नाही, हे विशेष! म्हशीच्या पाठीवर बसणाऱ्या लालूप्रसाद यादव यांना त्यावेळी चक्क हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये भाषणे देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आणि तिथे त्यांनी देशी बाणा दाखवत चक्क हिंदीमध्ये भाषणे दिली, हा इतिहास ताजा आहे.

ज्या भाजपाच्या अटलबिहारी सरकारच्या काळात रेल्वे घाट्यात आली. त्यावेळी अटलबिहारी यांचे स्वीय सहाय्यक असलेले अश्विनी वैष्णव यांना नरेंद्र मोदींच्या भाजपा सरकारमध्ये आता रेल्वेमंत्री केले गेले आहे. त्यांचा बायोडाटा झोकात मिरवला जात आहे. मात्र प्रथम IAS आणि नंतर MBA केलेल्या या महाशयांच्या बायोडाटाची चिरफाड केली असता, वेगळेच सत्य पुढे येत आहे.

जीई #GE आणि सिमेन्स #Siemens या बहुराष्ट्रीय कंपन्यांची भलावण करणारे आणि Vice President – Simens Locomotives & Head Urban Infrastructure Strategy, Managing Director GE Transportation अशी महत्वाची व्यवस्थापकीय पदे भूषविणाऱ्या या महाशयांनी आपल्या संघी व भाजपायी कौशल्याचा वापर करत जीई  आणि सिमेन्स या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या धंद्यात चांगलीच बरकत आणली आहे.

सध्या या कंपन्या भारतीय रेल्वेचे लचके कसे तोडीत आहेत, त्याची यादी खाली इंग्रजीत टाकली आहे. हा तथाकथित विद्वान भारतीय रेल्वे विकण्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविणार आणि देशांच्या मालमत्ता विदेशी कंपन्यांच्या घशात घालणार, हे लक्षात घ्यायला हवे. भारतीय जनतेचे जीवन चांगले करण्यासाठी म्हशीच्या पाठीवर बसणारे परंतु जनतेच्या गरजा ओळखणारे पाहिजेत. परंतु बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गरजांनुसार काम करणारे हे नवे रेल्वेमंत्री जनतेला आणि देशाला मात्र खड्ड्यात घालणार हे निश्चित! म्हणून सर्वात अगोदर सिमेन्स व जीई या कंपन्यांना दिलेल्या कंत्राटांची न्यायालयीन चौकशी करा! झालेल्या रेल्वे अपघाताची नीट चौकशी आंतरराष्ट्रीय मानक लावून करा!

नवे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव भूषवित असलेली पदे

Ashwini Vaishnaw

* Vice President – Simens Locomotives & Head Urban Infrastructure Strategy
* Managing Director GE Transportation
* Deputy secretary in the office of former Prime Minister Atal Bihari Vajpayee
* MBA from Wharton School of the University of Pennsylvania
IAS in 1994

1. Indian Railways, Siemens and TATA have together participated in a PPP project, the Pune Metro Line 3

 1. service wing is providing the maintenance services to the Mumbai line
 2. just now equipped Indian Railways with a 9000 HP locomotive
 3. Bombay trains are running with Siemens equipment
 4. In November 2007 the company bagged an order worth of Rs 870 million (Rs 87 CRORE) from McNally Bharat Engineers Pvt Ltd for supplying electricals for Rashtriya Ispat Nigam Ltd’s new Sinter Plant at Vizag
 5. sector will be having five divisions (Mobility Rail System Low & Medium Voltage Smart Grid and Building Technologies)
 6. In 2012 The Company won contract to modernize electricity distribution system for Maharashtra State Electricity Distribution Company.
 7. Siemens wins order to modernize Korba Stage-II plant of NTPC
 8. Siemens-powered Rapid Metro Rail Gurgaon begins operations. Siemens inaugurates State-of-the-Art Test Center for Motors. Siemens
 9. The company successfully delivers 1200kV CVT to National Test Station Power Grid.
 10. In 2015 the company has bagged orders worth Rs 450 CRORE from Varanasi-based Diesel Locomotive Works
 11. The company wins order worth Rs. 81 CRORE from Diesel Locomotive Works
 12. On 7 December 2015 Siemens announced that it has won a crucial order approximately worth Rs 377 CRORE from Indian Railways’ Diesel Locomotive Works (DLW) Varanasi.
 13. On 13 January 2017 Siemens Ltd. announced that it has won an order worth approximately Rs 98 CRORE from Diesel Locomotive Works (DLW) to design supply and install 48 Alternating Current (AC) Traction systems for Dual Cab High Horsepower Diesel Engine locomotive for Indian Railways.
 14. Siemens announced that the company along with Siemens Rail Automation Ltd. S.A.U Spain has jointly won an order worth Rs 287 CRORE to supply state-of-the-art signaling technology for the first two metro lines of the Nagpur Metro
 15. Sumitomo Electric Industries Ltd. has been awarded an order from Power Grid Corporation of India the central transmission utility of India to supply a high-voltage direct current (HVDC) transmission system. The total size of the order won by the consortium is US $520 million of which the share of Siemens is approximately Rs 1682 CRORE.