साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

कादंबरीकार राकेश वानखेडे यांचा डॉ. भालचंद्र कानगो यांच्या हस्ते सत्कार

‘पुरोगामी’ कादंबरी मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी निवडण्यात आल्याबद्दल अभिनंदन

प्रगतिशील लेखक संघाचे राज्य सरचिटणीस, सुप्रसिद्ध कादंबरीकार राकेश वानखेडे यांची ‘लोकवाङ्‌य गृह’ने प्रकाशित केलेली ‘पुरोगामी’ ही कादंबरी मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी निवडण्यात आली आहे. याबद्दल ‘लोकवाङ्‌य गृह’चे अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य डॉ. भालचंद्र कानगो यांच्या हस्ते नाशिक येथे लेखक राकेश वानखेडे  यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कॉम्रेड राजू देसले,  प्रकाश बनसोड, ॲड. दत्ता निकम, प्रकाश घटे, अविनाश दोंदे, सुरेश रोडे, प्रा. कोल्हे सर आदी उपस्थित होते.