साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

विद्रोही साहित्य संमेलनतर्फे संविधान प्रबोधनाचे काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा गौरव

नाशिक : संविधान सन्मानार्थ १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्यावतीने संविधानदिनी भीमनगर येथे नाशिक जिल्ह्यात संविधान प्रबोधनाचे काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्तींचा गौरव करण्यात आला. त्यांना प्रगतशील शेतकरी, साहित्यिक विष्णुपंत गायखे यांचे हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना श्री. गायखे म्हणाले, प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधान साक्षर होणे आवश्यक आहे. आम्ही सर्व भारतीय संविधानामुळे एक  आहोत. संविधान मूल्य जोपासने, रुजवणे आवश्यक आहे. हे काम अनेक संस्था, व्यक्ती करत आहेत. त्याबद्दल त्यांचा गौरव करताना आनंद वाटतो.

प्रत्येकाच्या घरात संविधान प्रत असावी. केंद्र सरकारने शेतकरी कायदे रद्द केले हा संविधानाचा विजय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकरी वर्गासाठी केलेले काम सर्वत्र पोहचवणे काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.

याप्रसंगी विचारमंचावर शशिकांत उनव्हणे, कवी रंगराज डेंगळे, चंद्रकांत भालेराव, साराभाई वेळूंजकर, गणेश उनव्हणे, प्रल्हाद मिस्त्री, दिपाली वाघ, आयटकचे राज्य सचिव राजू देसले आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी किशोर ढमाले होते.

राजू देसले यांनी प्रास्तविक केले. प्रा. नारायण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय उनव्हणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन संविधान प्रबोधन समिती  व विद्रोही साहित्य संमेलनाचे शिवदास म्हसदे, प्रा. नारायण पाटील, प्रल्हाद मिस्त्री, अजमल खान, स्वागताध्यक्ष शशिकांत उनवणे, मुख्य संयोजक कॉम्रेड राजू देसले आदींनी केले होते.

गौरविण्यात आलेल्या संस्था व व्यक्ती

१) मानवतावादी बहुउद्देशीय संस्था, नाशिक

२) राष्ट्र सेवा दल, नाशिक

३) छात्रभारती, नाशिक

४) लोकनिर्णय सामाजिक संस्था, नाशिक

५) ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF), नाशिक

६) टी. वाय. जाधव, नाशिक

७) महेंद्र गायकवाड, पिंपळगाव

८) उषा सरदार, नाशिक

९) डॉ वंदना कावळे, नाशिक

१०) आर. आर. जगताप, नाशिक

११) डॉ. पोपट पगार, कळवण

१२) मा. राजेंद्र दोंदे, नाशिक

१३) संगिनी महिला मंडळ, नाशिक

१४) डॉ. ज्योत्स्ना दिनकरराव सोनखासकर, प्राचार्य, कर्मवीर शांतारामबापू वावरे कॉलेज, सिडको, नाशिक

१५) न्यू उम्मीद संस्था, वडाळा गाव, नाशिक

१६) राहत फाउंडेशन, नाशिक

१७) भारतीय रक्षक संस्था, नाशिक

१८) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नाशिक जिल्हा

१९) खिदमत ग्रुप, नाशिक

२०) हसनैन फाउंडेशन, नाशिक.

२१) उषा रामकृष्ण सरदार, नाशिक