साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

दलित अधिकार आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षपदी कॉ. भास्कर लहाने, तर सचिवपदी कॉ. मधुकर खिल्लारे

औरंगाबाद : अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या औरंगाबाद जिल्हा अधिवेशनास चांगला प्रतिसाद मिळाला.५ तालुक्यातील भाकप, शेतमजूर युनियन व जनसंघटनांचे कार्यकर्ते यास उपस्थित होते. ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते पॅंथर रमेशभाई खंडागळे यांनी अधिवेशनाचे उदघाटन केले, तर आझाद पार्टीचे प्रदेश महासचिव प्राचार्य सुनील वाकेकर हे प्रमुख पाहुणे होते.
जात वर्गांताच्या लढ्यासंदर्भात रमेशभाईनी अत्यंत चांगली मांडणी केली. सुनील वाकेकर यांनीही १८-१९ डिसेंबरचे राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशन ही महत्वपूर्ण घटना असल्याचे म्हटले.
यावेळी अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाची जिल्हा कार्यकारिणीही निवडण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी कॉ. भास्कर लहाने, कार्याध्यक्षपदी कॉ. गणेश कसबे, जिल्हा सचिवपदी कॉ. मधुकर खिल्लारे यांची निवड एकमताने झाली. कॉ. राम बाहेती,
कॉ. अशफाक सलामी, कॉ. अभय टाकसाळ आदींसह ५१ जणांची ही कार्यकारिणी आहे.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले. १८ डिसेंबरच्या समता मिरवणूकीसाठी सर्व तालुक्यांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.