२४ ते २८ डिसेंबरपर्यंत आयोजन; नामवंत तज्ज्ञांचे होणार मार्गदर्शन
मुंबई : दिवसेंदिवस बेरोजगारीमध्ये वाढ होत असल्याने विद्यार्थी – युवक वर्ग मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला आहे. एकीकडे शासनाच्या अनास्थेमुळे सरकारी नोकऱ्यांचा तीव्र तुटवडा आहे. त्यातच शासनाच्या परीक्षा आयोजनाबाबत अनेक घोटाळे उघडकीस येऊ लागल्याने विद्यार्थी-युवकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सरकारीबरोबरच खासगी व असंघटीत क्षेत्रातही बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. एकूणच ही बेरोजगारी का वाढत आहे,त्याला जबाबदार कोण आणि रोजगार निर्मितीचे पर्याय काय? याबाबतचा सर्वंकष आढावा घेणारी विशेष व्याख्यानमाला ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (A.I.S.F.) आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशन (A.I.Y.F.) या विद्यार्थी व युवक संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
व्याख्यान १ ले । २४ डिसेंबर २०२१ । सायंकाळी ७ वाजता
विषय : स्पर्धा परीक्षेतील युवकांसमोरील समस्या व उपाय
वक्ते : भारत पाटील (संशोधक, युनिक फाऊंडेशन, पुणे)
अध्यक्ष : गिरीश फोंडे (समन्वयक, एम.पी.एस.सी. विद्यार्थी समन्वय समिती)
व्याख्यान २ रे । २५ डिसेंबर २०२१ । सायंकाळी ७ वाजता
विषय : बेरोजगारी : प्रचलित आर्थिक संरचनेची अपरिहार्य परिणिती
वक्ते : प्रा. संजीव चांदोरकर (अर्थतज्ज्ञ)
व्याख्यान ३ रे । २६ डिसेंबर २०२१ । सायंकाळी ७ वाजता
विषय : रोजगार निर्मितीचा कार्यक्रम व धोरण
वक्ते : आनंद करंदीकर (समन्वयक, विचारवेध)
व्याख्यान ४ थे । २७ डिसेंबर २०२१ । सायंकाळी ७ वाजता
विषय :असंघटीत व खाजगी क्षेत्रातील बेरोजगारी
वक्ते : सुकुमार दामले (ज्येष्ठ कामगार नेते, नवी दिल्ली)
व्याख्यान ५ वे । २८ डिसेंबर २०२१ । सायंकाळी ७ वाजता
विषय : बेरोजगारी विरुद्धचा लढा : संघटन व भूमिका
वक्ते : डॉ. भालचंद्र कानगो (ज्येष्ठ विचारवंत व कामगार नेते)
झूम ॲपद्वारे होणाऱ्या या व्याख्यानमालेत प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठीची लिंक सोबत दिली असून, AISFMaha या फेसबुक पेजवरूनही या व्याख्यानमालेचे थेट प्रसारण केले जाणार आहे. या व्याख्यानमालेत विद्यार्थी – युवकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन A.I.S.F. चे राज्याध्यक्ष विराज देवांग, राज्यसचिव प्रशांत आंबी आणि A.I.Y.F. चे राज्याध्यक्ष भाऊ प्रभाळे, राज्यसचिव जावेद तांबोळी यांनी केले आहे.
Zoom Link : https://us02web.zoom.us/j/3660639503?pwd=M0FKQmJ5dTlDODczeEdxK28vSEJsdz09
Meeting ID: 366 063 9503
Passcode : aisfaiyf
Facebook page Live : https://www.facebook.com/ /
More Stories
शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे ताबडतोब सुरु न केल्यास तीव्र आंदोलन : AISF चा राज्य सरकारला इशारा!
लढाऊ कामगार नेत्या कॉम्रेड सुशीला यादव यांना धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार जाहीर
कॉ.डॉ. प्रविण मस्तुद लिखित ‘अण्णाभाऊंचा रशियाचा प्रवास’ पुस्तिकेचे प्रकाशन