साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

कॉ.डॉ. प्रविण मस्तुद लिखित ‘अण्णाभाऊंचा रशियाचा प्रवास’ पुस्तिकेचे प्रकाशन

बार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सोलापूर जिल्हा सचिव कॉम्रेड डॉ. प्रविण मस्तुद लिखित ‘अण्णाभाऊंचा रशियाचा प्रवास’ या पुस्तिकेचे प्रकाशन भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पक्षाच्यावतीने दलित पँथरचे शहीद भागवत जाधव व रमेश देवरुखकर या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी कॉ. ठोंबरे म्हणाले, कॉ. अण्णाभाऊ हे श्रमिकांचा विचार जगले. श्रमिकांचा विचार ज्या रशियामध्ये क्रांतीने आला, तो रशिया पाहण्यासाठी अण्णाभाऊ रशियापर्यंत जाऊन पोहोचले. तिथे अण्णाभाऊंनी जे पाहिले, जे अनुभवले ते या पुस्तिकेमध्ये नक्की वाचावयास मिळेल.

याप्रसंगी लेखक कॉ. डॉ. प्रवीण मस्तुद, ए. बी. कुलकर्णी, लहू आगलावे, भारत भोसले, अनिरुद्ध नखाते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.