आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला शाहू महाराजांचे नाव न दिल्यास AISF उग्र आंदोलन छेडणार

कोल्हापूर : मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी AISF मुंबई आणि इतर संघटनांनी केलेली असतानासुद्धा, मुंबई विद्यापीठ प्रशासनाने त्या वसतिगृहाला माफीवीर सावरकर यांचे नाव दिले. याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन (AISF) च्यावतीने निदर्शने करण्यात आली. मुंबई विद्यापीठाने तातडीने आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नाव न दिल्यास AISF तर्फे राज्यव्यापी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

AISF चे राज्य सचिव कॉ. प्रशांत आंबी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हरीश कांबळे, धीरज कठारे, आरती रेडकर यांच्यासह विद्यार्थी कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक शाहू समाधी स्थळाला भेट देऊन, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले.

Leave a Comment

What does "money" mean to you?
  • Add your answer