वणी : महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने वणी कचेरीवर पूरग्रस्त व अतिक्रमण धारकांचाभव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या.
1) पूरग्रस्त भागातील शेतीला कोल्हापुर पुराप्रमाणे एकरी 50 हजार रुपये तात्काळ मदत जाहीर करावी.
2) पूर्णतः पडलेली घरे पुन्हा नवीन बांधून देण्यात यावीत व पडक्या घरांना 1 लाख रुपये मदत द्यावी.
3) स्थलांतरीत करण्यात आलेल्या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे.
4) NDRF चे निकष बदलण्यात यावे.
5) पूरग्रस्त परिस्थिबद्दल निवृत्त न्यायाधीश यांचे अध्यक्षतेखाली तज्ञ व्यक्तींची कमेटी नेमून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
6) नदी किनारी असलेले WCL मातीचे ढिगारे उठविण्यात यावे व नदीचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करावा.
7) अग्निपथ योजना त्वरीत मागे घेण्यात यावी.
या मोर्चात काॅ. अनिल घाटे, प्रा. धनंजय आंबटकर, सुनिल गेडाम, प्रविण रोगे, बंडु गोलर, डाॅ. तांबेकर, वासुदेव गोहणे, मोतिलाल चीरखारे, दत्तु कोहळे, पांडुरंग पिंपळशेंडे, शंकर केमेकार, राकेश खामनकर, भरत केमेकार, पांडुरंग ठावरी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.