यवतमाळ : वणी येथील वसंत जिनींग सभागृहात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे २० वे यवतमाळ जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनाला उपस्थित असलेल्या ११९ प्रतिनिधींमधून कॉ. अनिल घाटे यांची सलग तिसऱ्यांदा जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली.
पक्षाचे राज्यसचिव तुकाराम भस्मे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर व आयटकचे राज्यसचिव शाम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून हरडे सर, व्ही. बी. टोंगे, प्रा. धनंजय आंबटकर, अनिल हेपट होते. अध्यक्षस्थानी आयटकचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे होते.
या अधिवेशनात पुढील ३ वर्षासाठी पुढीलप्रमाणे ३८ सदस्यीय जिल्हा कौन्सिल निवडण्यात आली.
जिल्हासचिव : अनिल घाटे (वणी)
सहसचिव : बंडु गोलर (मारेगाव), संजय भालेराव (यवतमाळ)
कोषाध्यक्ष : निरंजन गोंधळेकर (यवतमाळ)
सचिव मंडळ सदस्य : लता रामटेके (मारेगाव), सुरेखा हेपट (वणी), गुलाब उमरतकर (बाभुळगाव), प्रदीप नगराळे (दिग्रस), अमोल गौरशेट्टीवार (पुसद).
जिल्हा कौन्सिल सदस्य : हिम्मत पाटमासे, ज्योति रत्नपारखी, सविता कट्यारमल, बंडु उईके, दिवाकर नागपूरे, ईश्वर दरवरे, विजय ठाकरे, अरुण जवके (यवतमाळ), दिपक माहुरे (बाभुळगाव), डाॅ.तांबेकर, पुंडलिक ढुमणे, दत्तु कोहळे (मारेगाव), दिलीप महाजन (नेर), सोनेराव कुमरे (पांढरकडा), सुनिल गेडाम, अनील हेपट, राकेश खामनकर, धनंजय आंबटकर, छाया गावंडे, अथर्व निवडिंग, उत्तम गेडाम, प्रमोद पहुरकर (वणी), पी. जी. गावंडे, किशोर कदम (दिग्रस), निखिल टोपलेवार, संतोष टमकेदार (पुसद), वासुदेव गोहणे, बापुराव पिंपळशेंडे (झरी), प्रविण आडे (राळेगाव).