भा.क.प.च्या नेवासा तालुका सचिवपदी कॉ. लक्ष्मण शिंदे यांची निवड

तालुका सहसचिवपदी कॉ. कार्तिक पासलकर व शोभाताई शिंदे यांची निवड

अहमदनगर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेवासा तालुका सचिवपदी कॉ. लक्ष्मण शिंदे यांची; तर सहसचिवपदी कॉ. कार्तिक पासलकर व शोभाताई शिंदे यांची निवड करण्यात आली. नेवासा (जि. अहमदनगर) येथे नुकत्याच झालेल्या तालुका अधिवेशनात ही निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. नामदेव गोरे होते. तर कॉ. लक्ष्मण कडू व कॉ. स्मिता पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रज्जाक सय्यद यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. त्यानंतर कॉ. बन्सी सातपुते यांनी पक्षाचा गेल्या तीन वर्षातील संघटनात्मक व राजकीय अहवाल सादर केला. या अहवालावर उपस्थित प्रतिनिधींनी चर्चा करुन, जनतेच्या प्रश्नावर तालुक्यात आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला.

केंद्रातील मोदी सरकार जनतेच्या मुलभूत प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी, जनतेचे लक्ष भावनिक मुद्याकडे वेधत आहे. जी.एस.टी. मुळे जनतेला प्रचंड महागाईला तोंड द्यावे लागत आहे. डिझेल-पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या असून जनतेची प्रचंड लुट सुरु असल्याचा आरोप प्रतिनिधींनी केला. शेतीसाठी लागणारी बि-बियाणे, खते, औषधे यांच्या किंमतीत प्रचंड वाढ झालेली आहे. मात्र शेतीमालाच्या किंमतीत कुठलीही वाढ झालेली नाही. या सर्वच प्रश्नावर लोकांना संघटीत करून चळवळ करावी, असे ठरवण्यात आले. परिषदेत ११ जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली. आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट गीताने परिषदेचा समारोप करण्यात आला.

Leave a Comment

What does "money" mean to you?
  • Add your answer