मुंबई : भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाविकास आघाडीसोबत आहे. म्हणूनच अंधेरी येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शिवसेनेच्या उमेदवारास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘भाकप’च्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेत हा पाठिंबा जाहीर केला.
मातोश्री बंगल्यावर आज दुपारी २.३० वाजता झालेल्या या भेटीत भा. क. प. चे मुंबई सचिव कॉ. मिलिंद रानडे, ज्येष्ठ नेते कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. प्रकाश नार्वेकर, कॉ. बाबा सावंत, कॉ. विजय दळवी आणि कॉ. बबली रावत यांचे श्री. ठाकरे यांनी स्वागत केले.
याप्रसंगी शिवसेना नेते अनिल परब, रवींद्र वायकर, अरविंद सावंत, सुनील प्रभू, रमेश कोरगावकर आणि मनीष कायंदे उपस्थित होते.