कोल्हापूर : येथील कॉ. दत्ता देशमुख पुरोगामी विचार मंचाचा यंदाचा प्रोत्साहन पुरस्कार आशा व अंगणवाडी कामगारांच्या नेत्या कॉम्रेड ॲड. माधुरी क्षीरसागर (परभणी) यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम ३०,००० रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून, लवकरच या पुरस्काराचे विरतण केले जाणार आहे.
कॉ. दत्ता देशमुख हे १९६४ पासून मृत्यूपर्यंत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळात वीज कामगारांच्या अनेक मूलभूत प्रश्नांची सोडवणूक झाली. वीज कामगारांनी १९९३ साली त्यांचा अमृतमहोत्सव कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरा केला होता. याप्रसंगी जमलेल्या निधीतून ‘कॉ. दत्ता देशमुख पुरोगामी विचार मंच’ची स्थापना करण्यात आली आणि १९९५ पासून महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात व कामगार क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांना गौरव पुरस्काराने, तर उदयोन्मुख कार्यकर्त्यास प्रोत्साहन पुरस्काराने सम्मानित करण्यात येते.
यंदाचा गौरव पुरस्कार अखिल भारतीर किसान सभेचे राष्ट्रीय नेते कॉ. डॉ. अशोक ढवळे यांना जाहीर करण्यात आला असून, रोख ५०,००० रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कॉ. ॲड. माधुरी क्षीरसागर यांना प्रोत्साहन पुरस्कार; तर दिवंगत खुदाबक्ष अब्बास पठाण (सोलापूर) यांना कृतज्ञता पुरस्कार जाहीर केला आहे.
यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कॉ. मा. वि जोगळेकर, सचिव कॉ. व्ही. डी. धनवटे, विश्वस्त कॉ. कृष्णा भोयर, कॉ. जे. एन. पाटील, कॉ. प्रदीप नेरुरकर, कॉ. बी. एम. कुलकर्णी उपस्थित होते.
1 thought on “कॉ. माधुरी क्षीरसागर यांना कॉ. दत्ता देशमुख पुरोगामी विचार मंचचा पुरस्कार जाहीर”
कॉम्रेड ॲड. माधुरी क्षीरसागर यांचे मनापासून अभिनंदन! अनेक वर्षे डाव्या चळवळीत झोकून देऊन काम करणाऱ्या तिला हा पुरस्कार मिळाला याचा अभिमान आणि आनंद वाटला. ती, राजन क्षीरसागर आणि एकूणच डाव्या चळवळीला पुढील लढाऊ कार्यासाठी शुभेच्छा 🌹🌹🍀🍀🌼☘️☘️