नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देशातील सद्य राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. भाजप सत्तेत आल्यापासून देशाची राज्यघटना, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीवर आक्रमणे होत आहेत. आपला प्रजासत्ताक मोडून काढण्यासाठी, त्याचा इतिहास पुन्हा लिहिण्यासाठी आणि राष्ट्रत्वाची पुनर्व्याख्या करण्यासाठी भाजप-आरएसएस प्रयत्न करत आहे.
त्यांच्या या संमिश्र कल्पनेचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी देशभर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन हा संविधान दिन म्हणून साजरा करावा. भारताच्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची व्याख्या धर्मनिरपेक्ष, कल्याणकारी आणि संघराज्य अशी केली आहे. एक ईश्वरशासित राज्य स्थापन करण्यासाठी भाजप-आरएसएस युती संविधानाच्या अत्यंत मूलभूत तत्त्वांना खोडून काढण्यासाठी सर्व पावले उचलत आहे. त्याचा प्रतिकार करण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी २६ जानेवारी रोजी पक्षाच्या प्रत्येक शाखेच्या आवारात आणि जिथे शक्य असेल तिथे राष्ट्रध्वज फडकवावा. तसेच पक्षाच्या घटकांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि प्रजासत्ताक घडवण्यात आपल्या पक्षाची भूमिका अधोरेखित करणारे विविध उपक्रम आयोजित करावेत. तसेच पक्ष घटकांनी प्रतिज्ञा म्हणून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करावे, असे निश्चित करण्यात आले आहे.
तसेच ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींचा हुतात्मा दिवस हा ‘धर्मनिरपेक्षता वाचवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या लढ्यात आणि देशाच्या मुक्तीसाठी गांधींनी बजावलेल्या भूमिकेव्यतिरिक्त, त्यांच्या जीवनातील एक महान संदेश म्हणजे आपल्या देशातील हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि धार्मिक सलोखा हा होता. ज्या काळात भाजप लोकांचे ध्रुवीकरण, द्वेष पसरवणे, सांप्रदायिक परिस्थिती निर्माण करणे आणि मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांच्या मनात तसेच दलित आणि आदिवासी लोकांच्या मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण करणे यासाठी आक्रमक आहे, अशावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ३० जानेवारी रोजी ‘धर्मनिरपेक्षता वाचवा दिवस’ पाळावा, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कॉ. डी. राजा यांनी केले आहे.