राहुल गांधी यांना अपात्र ठरविल्याबद्दलही निषेध
लोकशाही वाचवण्यासाठी भाजप-आरएसएस राजवट दूर करा : भारतीय कम्युनिस्ट पक्ष
नवी दिल्ली : देशपातळीवरील अनेक मुद्द्यांबाबत चर्चा करण्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींना भेटू इच्छिणाऱ्या विरोधी पक्षांच्या संसद सदस्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली दिल्ली पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोषी ठरविण्याच्या आणि अपात्र ठरवण्याच्या वेगामुळे लोकशाहीचे भवितव्य, असंतोष व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आणि घटनात्मक संस्थांच्या अस्तित्वाबाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्र सरकारच्या या हुकूमशाही वृत्तीचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
याबाबत पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की देशपातळीवरील अनेक मुद्द्यांबाबत चर्चा करण्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींना भेटू इच्छिणारे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि भाकपचे खासदार कॉम्रेड संतोषकुमार पी. आणि इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे शोचनीय आहे.
अदानी घोटाळ्यावरील संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी मान्य करण्यास ठामपणे नकार देऊन, केंद्रातील भाजप-आरएसएस राजवट संसदेला निरर्थक ठरवित, लोकशाही ठेचून काढत आहे. त्यामुळे आम्ही अशी मागणी करतो, की सर्व धर्मनिरपेक्ष, लोकशाही शक्ती आणि जनतेने एकजुटीने लढा दिला पाहिजे आणि राष्ट्र, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी भाजप-आरएसएस राजवट दूर केली पाहिजे, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
1 thought on “डावे, काँग्रेससह विरोधी पक्षांच्या संसद सदस्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून केंद्र सरकारचा निषेध”
very informative articles or reviews at this time.